Saturday 7 January 2023

कलिका हब्ब(अध्ययन महोत्सव) 2022-23


कलिका हब्ब (अध्ययन महोत्सव)2022-23

शिक्षण म्हणजे मुलांच्या डोक्यात गोष्टी भरणे नव्हे, तर ते त्यांच्यात कुतूहल जागृत करणे होय.                                                                                                                        -आईनस्टाईन

            या संदर्भात, कर्नाटकातील शिक्षण आणि साक्षरता विभागाने "अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम" लागू केला आहे ज्याने कोविड-19 नंतरच्या शालेय शिक्षणाकडे अतिशय योग्य दृष्टीकोन ठेवला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कालिका हब्ब(शिक्षण महोत्सव)हा उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना या उत्सवात स्वतः करायला, बघायला, विचार करायला, स्पर्श करायला, नवीन गोष्टी शोधायला आणि नवीन शिकायला प्रवृत्त करतात. हे याचं वैशिष्ट्य आहे.

"जे पाहिले जाते ते काही प्रमाणात लक्षात राहते, जे केले जाते ते अविस्मरणीय असते" या उक्तीची अनुभूती या अध्ययन महोत्सवाव्दारे आपल्याला येईल यासाठी शिक्षण महोत्सवा चार कोपरे आहेत. प्रत्येक कोपऱ्याची स्वतःची खासियत आहे. तर गाण्याचा कोपरा भाषेचा विकास करतो. कौशल्ये, कागद-कात्री मुलांच्या क्रियाकलाप वाढविण्यास मदत करतात: अशा अनेक कृती मनोरंजन व अध्ययन या दोन्ही पातळीवर खूप महत्वाच्या ठरतात.

अध्ययन पुनर्प्राप्तिी उपक्रम (KALIKA CHETARIKE) अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने 2022-23 या वर्षात राज्यात विविध स्तरांवर अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमाला पूरक असा असा अध्ययन महोत्सव 'कलिका हब्ब' आयोजित करण्याचे नियोजन आहे. घोकंपट्टीच्या पलिकडे आणि उपयोजनात्मक वैज्ञानिक विमर्शनात्मक शिक्षण दिले पाहिजे. हे सर्व अंश कलिका हब्ब' (अध्ययन महोत्सव) मध्ये समाविष्ट आहेत. शिकणे आनंदी असले पाहिजे तसेच जीवन कोशल्यांचा विकास ही 'कलिका हव्व (अध्ययन महोत्सव) ची संकल्पना आहे. हे N.E.P च्या मुलभूत तत्वांना धरून आहे.

उद्देश-

1) अध्ययन पुनर्प्राप्तिी उपक्रम आणि कृती आधारित शिक्षणाबद्दल पालक आणि समाजामध्ये जागरुकता   निर्माण करणे.

2) नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक अध्यापनाला प्रोत्साहन देणे.

3) विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड निर्माण करून त्यांना का? कसे? असे प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करणे.

(4) शिकण्याची प्रक्रिया आनंददायी बनवणे.

(5) विद्यार्थ्यामधील संकोच दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे.

6) विद्यार्थ्यांना गटांमध्ये आणि वेगवेगळ्या वातावरणात काम करण्यास प्रवृत्त करणे, विविध परंपटांचा आदर करण्यास प्रोत्साहित करणे.

व्याप्ती

1) राज्यातील 35 शैक्षणिक जिल्हे आणि 4103 तालुक्यामध्ये कलिका हब्च होणार आहे.

2) प्रत्येक केंद्रमधील विविध शाळांमधील एकूण 120 विद्यार्थी म्हणजे 4,92,360 विद्यार्थी केंद्र कलिका हच मध्ये सहभागी होतील.

3) प्रत्येक जिल्ह्यांतील विविध तालुक्यांतून एकूण 300 विद्यार्थी म्हणजे 10,500 विद्यार्थी जिल्हा कलिका हव्यमध्ये सहभागी होतील.

4) कलिका हब्बमध्ये सहभागी होऊन शिकलेल्यागोष्टींवर आधारित विद्यार्थ्यांच्या नायकत्वाखाली प्रत्येक शाळेत कलिका हव्य आयोजित केला जावा.

अध्ययन महोत्सव प्रक्रिया व उपक्रम कक्ष

·      लर्निंग फेस्टमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य व्यक्त करण्याची आणि विविध शाळांमधील विद्यार्थ्यासोबत नवीन    गोष्ट  शिकण्याची उत्तम संधी मिळेल.

·       कलिका हव्च मध्ये चार कोपरे आहेत.


1. पहिला कोपरा (करा व खेळा) ಮಾಡು ಆಡು

येथे विद्यार्थ्यांची विज्ञान आणि गणित कौशल्ये विकसित होतात. विद्यार्थी आपापसात चर्चा करताततार्किक विचार करतात आणि स्वतःच समस्यांवर योग्य उपाय शोधतात. विद्यार्थी त्यांचे मत व्यक्त करण्यास मुक्त वातावरण असेल. प्रश्नप्रयोगनिरीक्षणनियोजन आणि इतर पद्धतीद्वारे प्राप्त केलेल्या माहितीचे परिशीलन करून मूल्यमापन करतात.


संबंधीत विडिओ पहाण्यसाठी CLICK HERE वर CLICK करा

(संबंधीत विडिओ पहाण्यसाठी CLICK HERE वर CLICK करा.

  1. टेस्ट ट्यूब रॉकेट (CLICK HERE)
  2. पेन्सिल फॅन
  3. लटकणारे नाणे (CLICK HERE)
  4. डायजेस्टिव्ह सिस्टम मॉडेल
  5. ब्लिंकिंग डॉल(CLICK HERE)
  6. नॅनो सोलर सिस्टम सी डायव्हर (पृथ्वी-चंद्र मॉडेल) (CLICK HERE)
  7. क्लाइंबिंग लिझार्ड(CLICK HERE)
  8. स्पायरल सनेक (CLICK HERE)
  9. वॉटर फाउंटन(CLICK HERE)
  10. सुतारपक्षी(CLICK HERE)
  11. दृष्टीभ्रम(CLICKHEAR)
  12. धावणारा घोडा(CLICK HERE)
  13. थ्री डी चष्मा(CLICK HERE)
  14. कॉन्फरन्स कॉल
  15. PIN HOLE CAMERA(CLICK HERE)
  16. साबणाच्या फेसाची आकृती
  17. बॉल माउंट सन प्रोजेक्टर(CLICK HERE)
  18. सूर्य संदेश
  19. दुर्बिणी(CLICKHERE)
  20. कोनमापक तयार करणे (CLICK HERE
  21. Newton and Benham Disc(CLICK HERE)

1.              विभागात विज्ञानाची खेळणी बनवण्यासारखे अनेक उपक्रम आहेत. तयार खेळण्यांसह खेळणे, येथे सुचविलेले उपक्रम मुले आनंदाने करतील. खेऴत असतांना त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय शोधतात. इथल्या सर्व क्रियाकलाप, एकूणच या कोपऱ्याच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविण्यास किंवा एखाद्या घटनेविषयी कारणमिमांसा करण्याविषयी विद्यार्थी परिवर्तीत होतात.

2. दुसरा कोपरा:- कागद कात्री रंग

मुलांना रंग आवडतात, मुलांच्या अनेक सर्जनशील उपक्रमांसाठी कागद हे माध्यम आहे. या विभागात मुलांसाठी कागद, कात्री, रंग वापरून विविध आकार, बाहुल्या, चित्रे तयार करण्याचे अनेक उपक्रम आहेत. ओरिगामी आणि कागदी हस्तकलेतून मुलं चपळता, नीटनेटकेपणा, एकाग्रता शिकू शकतात. तो आनंदी राहू शकतो..


  1. एक फडफडणारा करकोचा (CLICK HERE)
  2. साळींदर (CLICK HERE)
  3. बेडूक(CLICK HERE)
  4. गोलाकारापासून  बेडूक(CLICK HERE)
  5. बोलकी मांजर (CLICK HERE)
  6. फोल्ड पेंटिंग स्पे पेंटिंग(CLICK HERE)
  7. फिंगर पपेट(CLICK HERE)
  8. मुखवटे (CLICK HERE)
  9. टॅन ग्राम (CLICK HERE)
  10. राजाचा मुकुट (CLICK HERE)
  11. मानवी सांगाडा(CLICK HERE)
  12. कोलाज (CLICKHERE)


               तिसरा कोपरा:- गाव व परिसर समजूया

          शिकणे वर्गाच्या केवळ चार भिंतीतच न रहाता त्यापलीकडे गेले पाहिजे. या विभागातील कृती मुलांना त्यांच्या सभोवतालच्या जगाशी जोडण्यास आणि गणितीय, वैज्ञानिक आणि भाषा रचनांद्वारे या जगाचे सौंदर्य व्यक्त करण्यास सक्षम करतात.

1.     झाडाची उंची मोजू

2.     झाडाचा अभ्यास

3.     इको ट्रॅव्हल मुलाखत

4.     चला नकाशा तयार करूया

5.     गावातील लोक किती विज वापरतात.

·       झाडाच्या अभ्यासात त्या झाडाची लांबी, रुंदी, उंची, पेट मोजून त्याची प्रत्यक्ष नोंद करणे म्हणजे गणिती संकल्पना झाडाचे वैज्ञानिक नाव, प्रादेशिक भाषेतील नाव, त्याचा उपयोग, ऑक्सिजन सोडण्याचेप्रमाण इत्यादीच्या सहाय्याने विज्ञानाची संकल्पना तयार करणे. त्या झाडाबद्दल विविध कवींनी लिहिलेल्या कविता, स्व-रचना, म्हणी, लोकगीते, ऐतिहासिक पौराणिक कथांमध्ये -नमूद केलेली भाषा संकल्पना, झाड, पान आणि साल चित्रनिर्मिती या अभ्यासातून विद्यार्थ्यांला शिकायला मिळेल. B) विद्यार्थी जेविक जग शिकून पर्यावरणप्रेमी बनतील

·          मुलाखत:- येथे विद्यार्थ्यांना प्रचंड जान मिळते, प्रश्न विचारण्याची, बोलण्याची, वेगवेगळ्या परिस्थितीत वागण्याची आणि वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधण्याची कला नित्याची बनते. पुढच्या आयुष्यात पत्रकार म्हणून, माध्यमात मुलाखतकार म्हणून जगू शकता.

·          नकाशा येथे मुलाला आपल्या घटाचा, शाळा, सहाचा / गावाचा नकाशा कसा काढायचा हे कळते. दिशा, स्केल आणि चिन्हांद्वारे ओळखण्याच्या कल्पनेसह नगा काढताना विचारात घेण्याचे महत्वाचे मुद्दे विद्यार्थी शिकतील.

चौथा कोपरा- गाणी,गोष्टी खेळ (ಹಾಡು ಆಡು)

या कोपऱ्यात भाषा कौशल्ये विकसित होतात. वयानुसार भाषाविषयक उपक्रम येथे दिले जातात. शव्दकोडीचुटकुलेगाणी गाणेकथा तयार करणे आणि सांगण्याचे कौशल्यनाटक तयार करणे आणि नाटक अभिनय करण्याचे कोशल्य विकसित होण्यासाठी या कोपऱ्यात विविध खेळ खेळल्यामुळे मुलाचा मेंदू आणि शरीराचे यांचा समन्वय होवून.विद्यार्थी केवळ गायन- खेळ कोपऱ्यात अतिशय प्रभावीपणे सहभागी होत नाही तर गटातील प्रवीन गोष्टी आनंदाने शिकतो.यामध्ये खालील साहित्याचा समावेश असेल

  1. शब्द गाणे (CLICK HERE)
  2. शब्दअंत्यक्षरी पदवृक्ष (CLICK HERE)
  3. शब्द शिडी शब्द शब्द (CLICK HERE)
  4. चला एक देखावा करूया (CLICK HERE)
  5. एक जीवन कथा तयार करूया (CLICK HERE)
  6. चला खेळू खेळ (CLICK HERE)
  7. टॉम आणि जेरी(CLICK HERE)
  8. राणीची इच्छा(CLICK HERE)
  9. कडबू गणेशा (CLICK HERE)
  10. फिश ट्रॅप गेम (CLICK HERE)
  11. फेर केअर गेम (CLICK HERE)
  12. सहजपणे क्रॉस करा (CLICK HERE)

1.                खेळ, गाणी, सादरीकरणातून आणि संवादांद्वारे अभिव्यक्तीला बाहेर आणण्यासाठी येथे उत्कृष्ट क्रियाकलाप दिले जातात. शिकण्यासाठी भरपूर गाणी निवडली आहेत. या उपक्रमांमुळे मुलांना केवळ शब्दांद्वारेच नव्हे तर त्यांच्या देहबोलीतूनही जगासमोर खुलण्यास मदत होते.

उपक्रमांचे आयोजन व इतर माहिती.

v प्रत्येक  केंद्र व्याप्तीतील सरकारी हायस्कूल मुख्याध्यापकांवट केंद्र स्तरावरील कलिका हव्वची जवाबदारी असेल. सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना केंद्र स्तरावटील कलिका हव्यसाठी 15000/- रुपये अनुदान जमा केले जाईल. केंद्रमधील सरकाटी हायस्कूल / सर्वोत्तम प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळा येथे केंद्र कलिका हव्वसाठी जागा नसल्यास केंद्र मधील इतर कोणत्याही ठिकाणी कलिका हव्व आयोजित करावा. केंद्रमधील विविध सरकारी शाळांमधून 4थी ते 9वी पर्यंतचे एकूण 120 विद्यार्थी केंद्र लर्निंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतील. तालुकास्तरावर प्रशिक्षण घेतलेल्या 5 शिक्षकानी संपन्मुल व्यक्ती म्हणून हा उत्सव आयोजित करतील. विविध शाळा मधून विद्यार्थ्यांना कलिका हव्यसाठी घेऊन आलेल्या शिक्षकांनी या उत्सवांतील कृती करण्यासाठी संपन्मुल व्यक्तींना मदत करावी.

v केंद्र स्तरावर कलिका हत्वचे आयोजन आणि यशस्वीतेची जवाबदारी सीआरपी आणि निवडलेल्या सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यापकांची असेल, कलिका हव्वसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना कलिका हब्नसाठी नेण्याची जवाबदारी संबंधित शाळांच्या शिक्षकांवर असेल.

v समाज, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत अध्यक्ष तसेच सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने गावातील शैक्षणिक उत्सव म्हणून साजरा करावा.

कलिका हब्ब मध्ये सहभागी होणाऱ्या मुलांची निवड

1)    केंद्रमधील सर्व सरकारी प्राथमिक/उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा निवडीसाठी विचार केला जाईल.

2)    इयत्ता 4थी ते 9वी च्या विद्यार्थ्यांचा विचार करावा.

3)    सर्व समुदायातील विद्यार्थी असतील याकडे लक्ष द्यावे.

4)    मुला-मुलींना समान संधी देणे.

5)    विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा निवडीसाठी विचार करणे अनिवार्य असेल.

6)    अध्ययनात मागास विद्यार्थ्याचाही विचार करावा.

    वरील बाबी लक्षात घेऊन, केंद्र मधील सर्व सरकारी प्राथमिक उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील किमान एक विद्यार्थी/ विद्यार्थिनी (म्हणजे केंद्रची कोणतीही शाळा न वगळता) याप्रमाणे एकूण 120 विद्यार्थ्यांची निवड करणे.

सजावट आणि परिसराची तयारी -

ज्या ठिकाणी कलिका हव्य आयोजीत केला आहे ती जागा मुलांना आकर्षक वाटेल अशा क्रियाशील आणि कलात्मक पद्धतीने सजवली पाहिजे. यासाठी स्थानिक विद्यार्थी/ विद्यार्थिनी, एनसीसी विद्यार्थी, एनजीओ, माजी विद्यार्थी यांची मदत घेऊन प्लास्टिकचे बॅनर न वापरता स्थानिक पातळीवर कापड़ी किंवा कागदी बॅनर वापरणे. मलखांब, दोटीचा खांब इ. जिथे मिळेल अशा शाळांच्या आवारात कलिका हच्च आयोजित करणे. त्याठिकाणी उपलब्ध विविध रंगाचे पन्नास मीटर कापड आवारात वांधून मुलांना त्यावर स्वतःची चित्रे काढण्यासाठी प्रोत्साहन देणे. ही एक सुंदर सजावट होईल. परिसराची एकूण सजावट कलात्मक विद्यार्थीस्नेही, पर्यावरणपूरक आणि आकर्षक असावी.

संपन्मूल व्यक्तींची निवड आणि तयारी

किमान 20 ते 25 संपन्मुल व्यक्तींची निवड करावी. त्यामध्ये चित्रकला, नाट्य, चित्रपट कलाकार, गायक, कलाकार शिक्षक निवडावे. आधीच प्रशिक्षित एसआरपी, एमआरपी, टीआरपी केंद्र संपन्मुल व्यक्ती आहेत याची खात्री करणे. जबाबदारीचे योग्यरित्या नियोजन करणे आणि चांगली तयारी करणे.

महोत्सवाचे उद्घाटन आणि समारोप

कलिका हव्वचा शुभारंभ अर्थपूर्ण आणि सोपा असावा. त्यासाठी जास्त वेळ घालवू नये. उद्घाटन सोहळ्याची वाट पाहत बसलेले विद्यार्थी शिविरात येताच उपक्रम सुरू करणे. सर्व विद्यार्थी सहभाग घेऊन उद्घाटन संपल्यानंतर उपक्रमाच्या सुरुवात होण्याची वाट पाहू नये. मुलं शिविरात येताच विभागीय उपक्रमात सहभागी होतील.

उद्घाटन समारंभात लांबलचक भाषणे आणि सन्मान नसतील. मुलांना मुकुट घालून पॅराशुट किंवा टॉकेटचे प्रक्षेपण करून एखाद्या उपक्रमाने उद्घाटनाचे आयोजन करणे. उद्घाटन आणि समारोप संक्षिप्त व सोप्या पद्धतीने होईल याकडे लक्ष द्यावे.

(टीप-माहिती भाषांतरीत आहे .काही महत्वाचेच मुद्दे याठिकाणी आहेत तेव्हा संपूर्ण माहितीसाठी मूळ आदेशाची प्रत वाचावी.)

धन्यवाद

सहकार्य

धडपड शिक्षक मंच खानापूर


1 comment:

Unknown said...

नक्की सर