Tuesday, 27 May 2025

FLN वार्षिक क्रिया योजना 2025-26

 मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)

अनुबंध -02

100% FLN साधनेसाठी वार्षिक क्रिया योजना 2025-26

माहेवार शैक्षणिक कृतिआराखडा

क्र.

महिना

कृती

कृतींचे विवरण

1

मे - 2025

शिक्षक पूर्वतयारी सभा

·      मुख्याध्यापक सर्व सह-शिक्षकांशी शैक्षणिक मार्गदर्शकाच्या मासिक कृती, निर्धारित 17 FLN अध्ययन फलनिष्पत्ती, (लक्ष्ये) सेतीबंध पूर्व आणि उत्तर परीक्षांमध्ये FLN अध्ययन फलनिष्पत्तीच्या आधारित, क्षणिक  साहित्याचा समावेश, शालेय कॅलेंडरमध्ये FLN उपक्रमांचा समावेश, उपचारात्मक अध्यापन तंत्रे, तसेच संबंधीत दाखलीकरणाबाबत संवाद साधतील आणि शालेय स्तरावरील कृती आराखडा तयार करून त्याबाबतची योजना तयार करावी.

2

जून - 2025

सेतूबंध व विद्याप्रवेश  
 
परिपाठातील कृती
 
समालोचन सभांमध्ये  FLN 100 % साधण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य तयार करण्यात यावे .

·      FlN मासिक कृती- (FL) लभूत साक्षरतेची  पाच प्रमुख क्षेत्रे जसे की, 1.मौखिक भाषाभिवृद्धी 2.संकेत संबंध 3.स्पष्ट वाचन 4.आकलना सहित  वाचन 5.लेखन
·      (FN) मुलभूत संख्याज्ञानाची पाच प्रमुख क्षेत्रे ज्यामध्ये प्रामुख्याने 1.संख्यांची ओळख 1.आकृत्यांचे आकलन 2.अवकाशाची परिकल्पना 4.मापन व 5.माहितीचे निर्वहन.
·      प्रश्नावलीच्या माध्यमातून पूर्व परीक्षेचे आयोजन तसेच FLN साधनेचे मूल्यमापन.त्याचप्रमाणे मागील इयत्तेतील अध्ययनावर (अध्ययन निष्पत्ती) आधारित पाच प्रश्न अशा एकूण दहा अध्ययन निष्पत्ती वर आधारित विद्यार्थ्यांची साधना A B श्रेणीमध्ये निर्धारित करावी.FLN च्या  श्रेणीतील मुलांना व तसेच गतवर्गतील पूर्वापेक्षित विद्यार्थ्यांसाठी परिहार बोधन कार्यक्रम चलवणे.  पूर्व परीक्षेप्रमाणेच साफल्य परिक्षा घेवून विद्यार्थ्यांचा साधनास्तर A व  या श्रेणीमध्ये निर्धारित करावा. साफल्य परीक्षेमध्ये B श्रेणी घेतलेल्या मुलांना शालेय शैक्षणिक योजनेमधील नमुना 4B व   5B  नमुद करून संबंधीत परिहार बोधन कृती आराखडा तयार करावा.
·      परिपाठातील अवधीमध्ये FLN अध्ययन कृतींना प्राधान्यता द्यावी.
·      विषय निहाय समालोचन सभांमध्ये  FLN 100 % साधण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य तयार करण्यात यावे .

3

जुलै - 2025

FLN मॉनिटरिंग कार्य व पूर्वतयारी बैठक
FA-1 ( एकत्रीकरण)

·      जुलै महिन्याच्या कामाच्या दुसऱ्या  दिवशी शाळा स्तरावरील प्रगती आढावा बैठक घेणे, 100% FLN साधना करावयाच्या मुलांच्या प्रगतीसाठी  शाळांच्या शिक्षकांनी  विशेष कार्यनिर्वहण अपेक्षित आहे.
पालक-पोषक बैठकांमध्ये 100% FLN साधनेसाठी शाळांतील शिक्षकांनी पालकांसोबत बैठका घेवून पालकांना घरातील वातावरण कशा प्रकापे शैक्षणिक ठेवून त्याअनुषंगाने काय करावे याबाबत पालकांशी चर्चा करावी र त्याचा पाठपुरावा करावा.
 
·      पालकांसोबत दैनंदिन जीवनाशी निगडीत मोजमाप,वेळ,पैसा,नमुने (pattern) व विविध आकृतीबंध याबाबत मुलभूत क्रियांबाबतचे रसप्रश्न कार्यक्रम/ गणिताचे खेळ/मनोरंजनात्मक गणित खेळ  व इतर संख्या सामर्थ्य कृती घ्याव्यात
·     
FA-1 मध्ये 100% FLN साधना करावयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासून, तद्नुषंगिक सुधारणा करण्यासाठी योजना आखणे अपेक्षित आहे.
 

4

ऑगस्ट - 2025

स्वातंत्र्य दिनाचं आयोजन
 
आप्तसमालोचन सभा

·      शाळा स्तरावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमांतर्गत, 100% FLN साधना केलेल्या शाळतील विद्यार्थी - त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन करून त्याची यशोगाथा तयार करावी  व त्या विद्यार्थ्याकडून त्याचे अनावरण करावे किंवा तत्सम प्रेरणादायी कार्यक्रम घ्यावेत.
 
·      आप्तसमालोचन सभेमध्ये  मुख्याध्यापक व शिक्षक 100% FLN साधनेसाठी त्यांच्या शाळेत करत असलेल्या कृती,व प्रात्यक्षिक,यशोगाथा याबाबत चर्चा करावी.

5

सप्टेंबर - 2025

शिक्षक दिन साजरा
FA-2(एकत्रिकरण)
संकल्पनात्मक मूल्यमापन - 1

 
·      100% FLN साधना केलेल्या शाळतील विद्यार्थी - त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन करावे
·      FA-2 मध्ये 100% FLN  साधना न केलेल्या विद्यार्थ्यांना ओळखून  विशेष कृतिआराखडा तयार करणे अपेक्षित आहे.
·      SA-1 मध्ये मौखिक मुल्यमापनामध्ये FLN चा समाविष्ट करण्यात यावा.

6

ऑक्टोबर - 2025

गांधी जयंती
समुदायदत्त  शाळा कार्यक्रम
आप्तसमालोचन सभा

·      FLN  मूलभूत पा क्षेत्रामध्ये प्राविण्यता मिळवलेल्या विद्यार्थ्यांकडून महात्मा गांधीजींबाबत पात्रभिनय ,आशुभाषण ,स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा, स्वच्छ गाव याबाबत अभिव्यक्ती ,चित्राच्या माध्यमातून व्यक्त होणे ,घोषवाक्य तयार करण्यासाठी त्यांना संधी द्याव्यात ऑक्टोबर मध्यांतर रजा अवधीमध्ये आपल्या वर्गाचा परिसर ,गाव, राज्य, देश व जगाच्या भौगोलिक स्थितीवर आधारित दूर -जवळ ,आत- बाहेर ,वर- खाली,उजवा- डावा,पुढे -मागे या शब्दांचा वापर करून बोलण्यासाठी व सोपी वाक्ये  तयार करावयाच्या कृतीं विद्यार्थ्यांना द्याव्यात.
 
·      पालकांच्या उपस्थितीत प्रश्नमंजुषा  कार्यक्रम ,memory game ,मौखिक गणित,मनोरंजनात्मक गणित व इतर संख्या सामर्थ्यावर आधारित कृती घ्याव्यात तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला सकारात्मक दाद द्यावी.
 
·      समालोचन सभेमध्ये FLN बाबत शाळेमध्ये करत असलेल्या कृतींच्या बाबत प्रात्यक्षिक ,यशोगाथा व प्रबंध स्पर्धेत  भाग घेणे.

7

नोव्हेंबर - 2025

कर्नाटक राज्योत्सव
बालदिन उत्सव
राष्ट्रीय शिक्षण दिवस
समालोचन सभा

·      शालेय पातळीवरील बाल साहित्य सभेमध्ये लहान कथा ,कोडी ,म्हणी ,स्थानिक कवींचा परिचय ,कविता व अभिनय गीतांचा उपक्रम राबविणे.    https://jeevandeep1.blogspot.com/
 
 
·      शालेय पातळीवर एफ एल एन अध्ययन उत्सव ,स्पष्ट वाचन शुद्धलेखन आणि सरळ गणित याबाबत नाविन्ययुक्त कृतींचे आयोजन करणे.
 
·      शाळा पातळीवरील आयोजन केलेल्या एफएलएम कृतींबाबत अवलोकन करून त्याची मूल्यमापन करून शेकडा 100% एफएलएम साधना केलेल्या शाळा हरित शाळा म्हणून घोषणा करणे.
 
·      एफ एल एन साधना व त्याच्याशी संबंधित समस्या व परिहार याबाबत चर्चा आयोजित करणे.

8

डिसेंबर - 2025

राष्ट्रीय गणित दिवस
समालोचन सभा

·      शाळा पातळीवर आयोजन करण्यात येणाऱ्या गणित दिवसानिमित्त  विद्यार्थ्यांच्या  संख्या सामर्थ्याला अनुसरून  मेट्रीक मेळावा,गणित मेळावा/ TLM मेळाव्याचे आयोजन करावे. FLN च्या अध्ययन फल निष्पत्तींचा यात समावेश असावा.
 
·      शेकडा 100 एफ एल एन साध्य न केलेल्याविद्यार्थ्यांसाठी नाविन्य युद्ध उपक्रमांबाबत चर्चा  करणे.

9

जानेवारी - 2026

गणराज्य दिन
 
पालक सभा
 
समालोचन सभा

·      FLN मधील मूलभूत पाच क्षेत्रे व पूर्वअपेक्षित अध्ययनातील यशस्वी विद्यार्थ्यांकडून संविधानाची प्रस्तावना व राष्ट्रगीताचे  आकलनासहित वाचन ,नागरिकांच हक्क व कर्तव्य त्याबाबत कृतींचे आयोजन करणे .
 
·      अभिरूप संसद कार्यक्रम घेणे .                                 https://jeevandeep1.blogspot.com/
 
·      घरामध्ये परिणामकारी व अध्ययन पोषक वातावरणबाबत तयार केलेल्या  पालकांची प्रशंसा व ते करण्याची आवश्यकता याबाबत चर्चा विनिमय

10

फेब्रुवारी 2026

 राष्ट्रीय विज्ञान दिवस
 
समालोचन सभा

 
·      शाळा पातळीवर आयोजित होणारे सोपे विज्ञान प्रयोग ,विज्ञान वस्तू प्रदर्शन ,विज्ञान नाटकेयामध्ये एफएलएम यामध्ये एफ यामध्ये FLN विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी आद्यता द्यावी .
 
·      Sa-2 लेखी परीक्षेमध्ये एप्रिल मधील सर्व विद्यार्थी भाग घेतील याबाबत विशेष काळजी घेणे.

11

मार्च-2026

 संकलनात्मक मु-02

·      Sa-2 लेखी परीक्षेमध्ये FLN मधील सर्व विद्यार्थी भाग घेतील याबाबत विशेष काळजी घेणे.
 
https://jeevandeep1.blogspot.com/

12

एप्रिल-2026

समुदायदत्त शाळा कार्यक्रम

·      शालेय स्तरावर FLN बाबत आयोजन केलेल्या विविध कृतींचे साहित्याचे, विद्यार्थी कृती संपूट, व इतर कार्यक्रमांचे प्रदर्शन भरविणे.
 
·      FLN साध्य करण्यासाठी शाळेच्या वतीने केलेल्या प्रयत्नांबाबत पालकांची प्रतिक्रिया घेणे

                                                       

 

सुचना- काही मजकूर संदिग्ध वाटल्यास मूळ प्रत (कन्नडमधील)संदर्भासाठी वापरावी.


No comments: