Monday 25 October 2021

1 ली ते 5वी वर्गांसाठी शैक्षणिक कार्ययोजना

कली-नली  वर्गांसाठी (1 ली ते 5वी)

सद्या भौतिक वर्ग प्रारंभ होत असल्याने मराठी,कन्नड, इंग्लिश ,गणित व परिसर अध्ययन विषयांमध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गांकरिता  उपलब्ध अध्ययनफल CLICKHERE  साहित्याचा उपयोग करून अध्ययन योजना तयार करावी. अशा सुचना शिक्षणविभागाकडून करण्यात आलेल्या आहेत.

    (संपूर्ण मार्गसूची (ಮಾರ್ಗಸೂಚಿ)पहाण्यासाठीCLICK HERE)

मार्गसूची


पहिले 10 दिवस

·   पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गाणी, कथा, चित्रकथा ,खेळ व  गटातील कृती इत्यादींच्या द्वारे शाळेविषयी आवड निर्माण करणे तसेच शैक्षणिक वातावरण निर्माण होईल अशा कृती विद्यार्थ्यांना देणे.


11 दिवसापासून 50 दिवसापर्यंत

·   पहिली दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिलीच्या अध्ययन सामर्थ्य नुसार मार्गदर्शन करून ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे. चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरीच्या वर्गाच्या सामर्थ्यांचा सराव करून घेणे व त्यानुषंगाने कृती देणे.


51 दिवसापासून 90 दिवसापर्यंत

·  पहिलीच्या विद्यार्थ्यांना निर्धारित केलेल्या अध्ययन सामर्थ्यांचा विचार करून त्याच्या पुनर्बलनासाठी अनुकूल अशा कृती देणे.
·  दुसरी व तिसरी च्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या वर्गाला निर्धारित सामर्थ्यानुसार मार्गदर्शन करून ती आत्मसात करून घेणे.
·  चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता चौथीच्या अध्ययन सामर्थ्य नुसार अध्यापन करून त्याचा सराव घेणे व आत्मसात करण्यासाठी आवश्यक कृती द्याव्यात.


90 दिवासापासून शैक्षणिक वर्षाच्या शेवटापर्यंत.

·   पहिली दुसरी व तिसरी च्या विद्यार्थ्यांना संबंधित वर्गाला सूचित केलेल्या अध्ययन सामर्थ्याला नुसार सराव घेऊन ती आत्मसात करून घेण्यासाठी सहाय्यक अशा कृतीद्वारे  अनुकूल अध्ययनानुभव देणे.
·   चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांना संबंधित वर्गानुसार आवश्यक सामर्थ्य आत्मसात करण्यासाठी  विविध कृतीव्दारे अध्ययनानुभव देणे.

 



विध्यांजली 2.0 चे उद्देश,आवश्यकता व  शाळा रजिस्ट्रेशन करण्याबाबतचे  मराठी विवरण Vidhyanjali2.0 School Registratioपहाण्यासाठी वरील विडीओ पहा व आपल्या शाळा Vidhyanjali2.0  पोर्टलवर नोंदणी करा.




No comments: