Thursday 14 October 2021

वर्गाध्यापनावेळी उपयुक्त 

विद्यार्थीकेंद्रीत वैयक्तिक व गटातील कृती

    प्रभावी शिक्षणाची सोय करण्यासाठी वर्गात आणि बाहेर सतत कृतीं विकसित करायला हव्यात.

·      कृतीमध्ये विविधता असावी.

·      उद्देशपूर्ण व सरळ कृतींचे आयोजन असावे.

·      प्रत्येक कृती ही पूर्वनियोजित असावी.

·      अद्यनाला पूरक अशा विविध पध्दतीने विविध कृतींचे आयोजन असावे.

·      कृती  गट अध्ययनयुक्त व सर्व मुलांच्या सहभागी होण्यावर भर  असावा.

·      गट विभागण्यास मुलांना स्वतंत्र्य द्यावे.

·      गट अध्ययन व उद्देश साध्य करण्यासाठी शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष द्यावे.

·      मुलांच्यातील सहज प्रवृत्त- कुतूहल, प्रश्न विचारण्याचे मनोभाव, चिकीत्सक बुध्दींना मारक ठरतील अशा कृती नसाव्यात.

    सध्याच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थी-केंद्रित शिक्षणावर बराच जोर देण्यात आला आहे. पाठांतर पध्दत कालबाह्य झाली असून शिकण्याच्या नवीन पध्दत येत आहेत.अध्ययनाला  आवश्यक अशा सुगमकारांनी (Facilitator) उपलब्धता  करून दिली तरी त्याच्या मागे अनेक समस्या येतात. या समस्यांचे निवारण करण्यासाठी  सुगमकारांनी अनेक मार्गदर्शकतत्त्वे अवलंबली जाणे आवश्यक आहे. अशा संदर्भामध्ये कृतींचे नियोजन करून परिपूर्ण अध्ययन करता येईल.विध्यार्थ्यांमध्ये  वैयक्तिक, समवयस्क गट किंवा  गट कृती देता येईल. कधी कधी उपक्रम संपूर्ण वर्गाला  देता येईल.

1.अध्ययन स्थानक कृती

    या कृतीसाठी समाज विज्ञानमधील वंशावळी, तत्वज्ञानी, वास्तूशिल्प, राज्य घराणी, पृथ्वीचे थर, वणस्पंतींचे वर्गिकरण, प्राणी, वैज्ञानिक असे कोणत्या तरी अंशाला अनुसरून कार्डांवर सविस्तर लिहीणे, ते ठराविक ठिकणी ठेवणे. मुलांचे 4 किंवा 5 गटात वर्गीकरण करणे, (कार्ड लक्षात घेऊन) कार्ड ठेवलेल्या ठिकाणी गट वर्तुळात जाणे. तो विषय वाचून आपापल्यामध्ये चर्चा करणे, नंतर फुढील कार्डाकडे जाणे.कार्ड ठेवलेले ठिकाण म्हणजेच अध्ययन स्थानक होय. यामुळे मुक्त चर्चा होते व अध्यापकाचे त्रास कमी होतात. याप्रकारे कोणत्याही विषयासाठी ही कृती वापरता येते.

2. आमचा गट - तज्ञ गट शिक्षण (OUR GROUP-EXPERT GROUP)

    या कृतीत सर्व प्रथम 5 किंवा 5 विध्यार्थ्यांचा एक गट करणे. हा गट आमचा गट असेल सुरवातीला या गटाला कांहीही काम नसेल मात्र शेवटी असेल. पुढील टप्प्यामध्ये प्रत्येक सदस्याला एक क्रमांक देणे. समान क्रमांक असलेल्यांचे वेगळे गट करणे, हा गट म्हणजे तज्ञ गट होय. तज्ञ गट आपणाला दिलेल्या एका अध्ययन अंशावर सखोल चर्चा करतात. दिलेल्या विषयावर प्रभूत्व मिळवतात. यावेळी शिक्षक प्रत्येक गटात चर्चा सुगम होण्यास मदत करतात.त्यानंतर सर्व सदस्य आपल्या मूळ गटात सामिल होतात व, आपण चर्चा केलेला विषय मूळ गटाबरोबर सामायिक करतात. प्रत्येक सदस्य हा एका विषयावर प्रभूत्व मिळविल्याने मूळ गटात त्याचे विश्लेषण करतो, यामुळे सर्व अंशावर सखोल माहिती मिळते. अधिक माहितीसाठी शिक्षकाशी संपर्क साधने. व्याख्यान पध्दत अनिवार्य मानणाऱ्यांनसाठी यापध्दतीने विषय शिकविणे प्रभावी ठरू शकतात.

3.सहवर्ती अध्ययन (Pair Work) कृती

    दोघांच्या जोड्या करून विषयातील तुलनात्मक विषय चिठ्ठीवर लिहून ठेवणे , ते निवडण्यास सांगणे , व सहपाठीबरोबर त्याबद्दल चर्चा करण्यास संधी उपलब्ध करणे.

    उदा. विज्ञान विषयातील शाकाहारी-मांसाहारी, मुलद्रव्ये- संयुगे, मृदु-कठीण, प्राणी-वनस्पती याप्रमाणे.समाजामधील वंशावळ, वास्तुशिल्प, राज्यशासनकाल, पृथ्वीचे आवरण, वनस्पती, प्राणी, सामाजिक शास्त्रज्ञांची नावे  याप्रमाणे.....

4.गटकार्य (Group Work)

    गट कृतीमध्ये दोन विद्यार्थी गट, तीन विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थ्यांचे गट आयोजित केले जाऊ शकतात. या गटांकडे सामाज विज्ञानात बरीच राजे-राणी-शासनकर्ते आहेत राज्यकर्ते, ठिकाणे, दर्शने, नद्या, राष्ट्र नेते, देश किंवा राजधानी, ग्रह, तारे / आकाशगंगेची नावे दिली जाऊ शकतात.विद्यार्थ्यांना गटांमध्ये विभाजित करून शिकण्यासाठी योग्य असे उपक्रम आयोजित करा.प्रत्येक गटाला स्वतःची जबाबदारी / चर्चा द्या. प्रत्येक गटातील मुले चर्चेत आहेत सहभागाचे निरीक्षण करत आवश्यक मार्गदर्शन करणे. गटात मुलाचा सहभाग, कोठे आहे उद्भवलेल्या  गोंधळ / अडथळ्यांविषयी आवश्यक सल्ला देत,परस्पर शिकण्याकरिता आवश्यक संधी देणे.सध्या पाठ्यपुस्तकात या प्रकारची गट चर्चा आणि माहिती एकत्रित दिलेली आहे,हे मुलाला शिकण्याची सवय लागण्यास  आणि ज्ञानाची रचना करण्यास उपयुक्त आहेत. प्रत्येक संदर्भांमध्ये विद्यार्थाचे सिंहावलोकन (feedback)  करण्यास किंवा विद्यार्थ्याला स्वतः पुनरावलोकन करण्यास संधी असते. प्रस्तुत शिक्षणव्यवस्थेत कृतींचे नियोजन करणे किती आवश्यक आहे तितकेच त्यांचकडून निरंतर मुक्त पुनरावलोकन (feedback) घेणे हे प्रामुख्याने अध्ययन निष्पत्तीचे फळ असेल.

    उदा.  1. मंदिर, मशिद किंवा भौतिक स्मारक, भेट देवून वैशिष्ट्ये नोंदी करणे. ग्राम पंचायत

    किंवा अशा कोणत्याही केंद्रास भेट देणे चालणाऱ्या सभा व इतर विषयी माहिती संग्रहित करणे.

    2.सचित्र चिन्हे, वनस्पती, प्राणी, पक्षी, नाणे आणि झेंडे यांची छायाचित्रे संकलित करण्याची कृती.

    3 एखाद्या कार्यरत मॉडेल पाहणे, तेथे चर्चा करणे व निष्कर्ष/ निर्णय घेण्यास वाव देणे.

    विज्ञान विषयात येणारी वैज्ञानिकांची नावे, मुलद्रव्ये- संयुगे, कार्बन संयुगे, ग्रह, नक्षत्रे,आकाशगंगा ईत्यादी

    4.जल शुध्दीकरण घटकला भेट देणे, अवस्थेविषयी आणि पद्धतींबद्दल जाणून घेण्यासाठी जल शुध्दीकरण केंद्रास भेट द्या,शुध्दिकरणाचे टप्पे, तसेच पध्दतीबद्द्ल जाणून घेऊन दाखलीकरण ठेवणे.

    5.प्राणी-पक्ष्यांचे (कोंबडी,बेडूक) वाढ व विकास दाखविणारे चित्र संग्रह

    कोंबड्यांचे जीवन चक्र पहा; अंड्यातून कोंबड्यात वाढणारी अशी विविध  टप्प्यात होणारी वाढ निरीक्षण करणे आणि योग्य प्रतिक्रिया देणे.

    6.एका  महिन्यांत चंद्राच्या वेगवेगळ्या  आकारांचे निरीक्षण करणे आणि त्यावर चिंतन करण्यास  देणे

    7.त्यांच्या सभोवतालच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याच्या विविध पद्धती पहाणे, पुनरावलोकण (feedback) करणे.

    8. एखादे कार्यरत मॉडेल पाहणे, तेथे चर्चा करणे व निष्कर्ष/ निर्णय घेण्यास वाव देणे.

5. चर्चा पध्दती

    मुक्त चर्चेसाठी चर्चा पध्दती  फार फायदेशीर ठरते. येथे विध्यार्थी - विध्यार्थी व शिक्षक – विध्यार्थ्यांतंर्गत चर्चा होते. जेंव्हा विध्यार्थ्यामधील चर्चा एका टप्यावर येऊन थांबते तेंव्हा शिक्षक प्रश्न विचारून अथवा विशेष माहिती देत ती चर्चा एका विशिष्ट पातळीवर नेता येते.चर्चा ही सहअध्ययनातून विध्यार्थी समस्या निवारण करण्यास प्रयत्न करत, परिकल्पना समजून घेत, सखोल चिंतन – मनन करत एका विशिष्ट पातळीने ज्ञानाची रचना करण्यास प्रेरीत करणे अपेक्षित आहे.

6.सांदर्भिक दाखले.(Anecdotal Record )

    विध्यार्थ्याच्या वर्तनांचे अवलोकन करून दाखलीकरण करण्याचे साधन होय. त्याच्या जिवनात घडलेली एक अभूतपूर्व घटना / वर्तनाचे दाखलीकरण करणे होय. एका सहज संदर्भामध्ये विद्यार्थ्याचे वर्तन दाखलीकरण केल्यामुळे त्याच्या/ तिच्या जीवनातील अद्भूत चरित्रच या दाखल्यातून उघडून ठेवू शकतो. एका संरचित, विमर्षात्मक  रितीने दाखल्यांचे निर्वहण शिक्षकाने केले पाहिजे. अधिक माहितीसाठी साधन व साधन-पुष्ठी  पुस्तक पडताळा.

7. विविध विषयांची दैनंदिनी

    प्रत्येक शिक्षक व विध्यार्थ्याने जन्मापासून शेवटपर्यंत  आपण पाहिलेले अनेक वाईट तसेच  वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग स्वतः दाखलीकरण करण्याचे प्रयोगशील प्रयत्न म्हणजे दैनंदिनी (डायरी) होय. ही डायरी  त्यांच्या आवडीप्रमाणे भाषा, गणित, समाज विज्ञान, भूगोल, विज्ञान, वनस्पती, प्राणी, राँकेट, डायनाँसोर असे विविध विषया अथवा एका विषयासंबंधी सखोल नोंद करण्यासाठी ही डायरी महत्वाची असते. प्रोजेक्ट रूपातदेखिल डायरी करता येते. याप्रकारची डायरी शिक्षकांना संपन्मूल तर विध्यार्थ्याना अमुल्य ठेवा म्हणून होईल.


(संग्रहित)

गोविंद पाटील

8970742305


No comments: