Friday, 29 October 2021

cce

सातत्यपूर्ण व सर्वंकष मुल्यमापनाशी(C.C.E) संबंधीत 

शिक्षकांनी वैयक्तिकरित्या ठेवावयाचे महत्वपूर्ण  दाखले 

1.   अंदाजपत्रिका (CONSPECTUS)

2.   पाठनियोजन (LESSON NOTES)

3.   शिक्षकांची वैयक्तिक नोंदवही (TEACHER INDIVIDUAL RECORD)

4.   एकत्रीकरण नोंदवही (CONSOLIDATD MARKSHEET)

5.   विद्यार्थी कृती संचिका (CHILD PROFILE)

6.   प्रगतीपुस्तक (PROGRESS CARD)


विद्यार्थी कृती संचिका (CHILD PROFILE)

                                  विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीबरोबरंच, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत ,आकारिक व संकलीत मुल्यमापनादरम्यान विद्यार्थ्यांच्या अध्ययनाशी संबंधीत खालील साधन व तंत्राच्या माध्यमातून आपण दैनंदिन कार्य दिल्यानंतर संबंधीत सर्व दाखल्यांचे निर्वहन विद्यार्थी कृती संचिकेत समाविष्ट करून त्याचे जतन करून ठेवणे  बंधनकारक आहे.तसेच विद्यार्थी एका वर्गातून पुढच्या वर्गात जेव्हा जातो तेव्हा संबंधीत  विद्यार्थ्याच्या दाखल्यासोबत त्याची कृती संचिका पुढील वर्गात देण्यात यावी.

· दैनंदिन निरीक्षण नोंदी (दैनंदिन नोंदी  हे प्रत्याभरण(FEEDBACK) असावे टीकात्मक  असू नये)

· तोंडी काम (प्रश्नोत्तरे,प्रकट वाचन,भाषण,भुमिकाभिनय,मुलाखत,गटचर्चा  प्रात्यक्षिके प्रयोग,)

·प्रात्यक्षिके /प्रयोग,

·उपक्रम/कृती(वैयक्तिक,गटात केलेले किंवा स्वयंध्ययनाव्दारे)

·प्रकल्प

·चाचणी( अनौपचारिक किंवा पुस्तकासह OPEN BOOK TEST)

·स्वाध्याय/वर्गकार्य (माहिती लेखन,वर्णन लेखन, निबंध लेखन,अहवाल लेखन,कथा लेखन,पत्र लेखन,संवाद लेखन व कल्पना विस्तार इ.)

·इतर प्रश्नावली,सहाध्यायी मुल्यमापन,स्वयंमुल्यमापन,तपशील पट्टी,गटकार्य व इतर

वरील सर्व कृती/उपक्रमांशी संबंधीत  दाखले कृतीसंचिकेत  सामविष्ट असणे बंधनकारक आहे.


 


No comments: