Friday, 15 May 2020

जावे त्याच्या वंशा..........................

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, लोकं उभी आहेत आणि बाहेरील

कार्यालयीन जबाबदारीचा भाग म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून कोरोना काळात बाहेर जाणं हे आता सरावाचंच झालेलं आहे.त्यात मग आजारासंबंधीची घरगणती असेल किंवा इतर अन्य. वेगवेगळी कामे सतत करत असतांना परवा लकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांना आपापल्या राज्यात परतण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्य चालू असतांना त्यातील जबाबदारीचा भाग म्हणून तब्बल 120 मजूरांची जबाबदारी माझ्याकडे आली.त्याना त्याच्या मूळ गावी पोचवण्याचा प्रवास कणकुंबी (खानापूर)येथून यादगीर जिल्यातील हुणसगी तालुक्यातील लमाण तांड्यावर संपुष्टात आला. बिचारे लॉकडावून चालू झाल्यापासून अडकून पडलेले असतांना काम नसल्याने कुणी घरभाड्यासाठी घर सोडलेलं किंवा खाण्यापिण्याची वाणवा झालेल्यांमुळे छावणीत आलेल्या या मजुरांना घेवून रात्री 9च्या सुमारास चालू झालेला हा प्रवास दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू होता यावेळेत कुठेही त्यांची भूक भाकरीतुकड्याला भेटली नाही. पहाटे दोनेक वाजता बेळगावातून निघाल्यावर विविध चौकश्यांचा समेमिरा पार करत(खरतंर त्या विमानविरांचा असा व्हावयास हवा होता) दुपारी 3 वाजता यादगिर जिल्ह्याच्या सिमेवर सशुल्क प्रवासाने (जायचे 500 व खाली बस परत यायचे 500 असे एकूण 1000 किंवा जे दर असतील त्याच्या दुप्पट) हुणसगी येथील वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्या गावी पोचल्यानंतर संपुष्ठात आला. त्यांनंतर बेळगावच्या सी.बी.टी .स्थानकात बऱ्याच दिवसापासून उपाशी डासासोंबत उघड्यावर झोपण्याचा व त्यानंतर हातपायावरील कंडू शमवून लाल झालेल्या पायांनी सकाळच्या सुमारासून पायी गाडीने घर गाठण्याच दुर्मिळ योगही होताचं.दरम्यान या प्रवासात पाण्याव्यतिरिक्त आपल्याकडे काहिच नव्हते व ते मिळायची जवळजवळ शक्यताही नव्हती, अशापरिस्थितीत महिनोनमहिने अनवाणी व उपाशी चालणाऱ्या मजूरांचं दुःख आठवल्यावर आपल्यावरील ओढवलेला हा प्रसंग अतिशय खुजा वाटला. मजुरांनी तिकीटाची जुळवाजुळव करतांना त्यांनी पैशाकडं न पाहता किंवा येणाऱ्या अर्थिक चणचणीचाही विचार क्षणभर केला नाही कारण गावाकडे कुणाची लहान मुलं तर कुणाचे आई-वडिल घरातंच वाट पाहत होते. अशा अनेक कारूण्यकथा या बसमधून प्रवास करत होत्या. शिवाय स्वच्छ रहा असं सेलिब्रेटींकडून नुसत्या जाहिराती करून प्यायलाही पाणी कुणी देवू शकत नव्हत हे वास्तव ओरडणाऱ्या टि.व्ही चॅनल्सना कळणं तसं अवघडंच.घराबाहेर पडू नका असं सांगतांना ज्यांचे पोटंच घराबाहेर पडल्याशिवाय भरू शकत नाही अशांचं भविष्य आता एरवी पहाटेचे भविष्य सांगायला येणारेही सांगू शकणार नाहीत. नुसत्याच बोलण्यानं अवघड बनत चालल्लेला हा वायरस व त्यामुळे बिघडत चाललेली परिस्थीती ही आणखी भयानक वाटते जेव्हा कुणी म्हणतो की “तुम्ही रेड झोनमध्ये आहात जरा दुरूनंच बोला”,तेव्हा आपली पोटाची भूक हा एक गौण मुद्दा बनतो मग तुमचा जीव ट्रेन खाली जावो किंवा चालतांना रस्त्यात.अशा मजुरांचे व गरींबांची अवस्था प्रॅक्टीकली अनुभवतांना #कोरोनापेक्षा #गरीबींच भयानक वाटली.शेवटी पुढील चोैदा दिवस माझ्यासाठीही महत्वाचे आहेतच.तेव्हा #घरीच_रहा_व_सुरक्षीत_रहा.सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या प्रत्येक नियमांचे पालन करा.

GOVIND PATIL

2 comments:

Justdo2prakash said...

खूप छान👍👍👍👍 असाच लिहीत जा 💐💐💐

Unknown said...

खरोखर खूप खूप कष्ट घेतले आहे. थोडी विश्रांती घ्यावी. सुंदर लेख धन्यवाद सर.